Posts

Showing posts with the label A
Image
असे छायाचित्र तुम्ही फार क्वचित पाहिले असेल, ना असे छायाचित्र परत कधी काढले जाईल. मराठीतले नऊ नामवंत कवी एकाच फोटोत! ज्यांची नावे आपण फक्त शाळेच्या पाठयपुस्तकात तर कधी सुंदर काव्याच्या पुस्तकावर बघत आलोय. नवरत्ने : (बसलेले) संजीवनी मराठे, पद्मा गोळे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर आणि वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज.  (मागे उभे) मंगेश पाडगावकर, वसंत बापट, ग. दि. माडगूळकर, वा. रा. कांत Sdfttt

भारताची धर्मनिरपेक्षता - महेश एम. लोहार

  भारताची धर्मनिरपेक्षता -  महेश एम. लोहार राज्यशास्त्र विभाग , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर प्रस्तावना -       भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून भारतीय जनतेने मोठा संघर्ष केला आहे. या संघर्षात भारतीय जनतेला काही मूल्यांचा , तत्वांचा स्विकार करावा लागला होता. स्वातंत्र्य संघर्ष करताना तत्वे , मूल्ये जोपासून स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केला आहे. भारतीय नेत्यांनी सामाजिक , राजकीय स्थित्यांतरांच्या माध्यमातून तत्वांना , मूल्यांना आकार दिला होता नंतर याचा अंतर्भाव उद्देश पत्रिकेमार्फत संविधानात व्यक्त केला आहे. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आले. उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग आहे पण त्यास कायदेशीर मान्यता देण्यात आली नाही. या उद्देशपत्रिकेत सुरूवातील ‘ धर्मनिरपेक्षता ’ हा शब्द समाविष्ठ नव्हता. तसेच ‘ समाजवादी ’ आणि ‘ अखंडता ’ या शब्दांचा समावेशही नव्हता. 1976 च्या 42 व्या घटना दुरूस्तीने हे तिन्ही शब्द उद्देशपत्रिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. थोडक्यात ‘ धर्मनिरपेक्षता ’ हा शब्द 42 व्या घटना दुरूस्त...